पटेल तो कटेल काय?
वात्रटिका
पटेल तो कटेल काय ?
---------------------------
आपल्या फायद्यासाठी
दुसऱ्याचे घर फोडणे
ते ते आता शुद्ध झाले
जे जे वाटत होते लोढणे
सत्तासाठी असला आटापिटा
थोडी मनाची वाटेल काय ?
असली पार्टी विथ डिफरन्स
'पटेल' तो सहज कटेल काय ?
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.12/08/2016
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका
Comments
Post a Comment