वात्रटिका समूह

*मराठी वात्रटिका समूह:एक साहित्य चळवळ*

  आजच्या युगाला ऑनलाइन युग म्हणावे लागेल यामध्ये whatsapp ची खुप क्रेझ आहे.
भारतात जवळजवळ 18 कोटी समूह आहेत.आशा या मायाजालात दि.०३.०६.२०१६रोजी सूर्यकांत डोळसे यानी तयार केलेला *मराठी वात्रटिका समूह* एक आहे. जो आज एक साहित्य चळवळ आहे.रविकिरण मंडळातुन जसे अनेक कवी जन्माला आले तसेच अनेक नवीन वात्रटिकाकार या समुहामुळे तयार होत आहेत.

   वात्रटिका, त्यावर चर्चा, सूचना, मार्गदर्शन या व्यतिरीक्त समूहवार काही चालत नाही.आज या समुहात एकूण 39 सदस्य आहेत
त्यामध्ये
सूर्यकांत डोळसे–चिमटा
संजय बालाघटे–उलटा चष्मा
किरण बेरड–तडका
मंदार अरोळेे–आरोळी
महावीर चौहान–महावीरवाणी
सत्यप्रेम लगड–सत्यवाणी
संताजी चौगुले–संतवाणी
राजाभाऊ सोमवंशी–तडका
शरद ठाकर–गुगली
बलिराम कदम–कानपिळी
रत्नाकर जोशी–रत्नहार
निवास लोखंडे–धुमधडाका
विलास कोळनुरकर–आसुड
मिलिंद धोदरे–खांदेशी चिमटा
कृष्ण शिंदे–गुगली
विशाल मसके–तडका
रंजीत डांगे–नेमबाजी
शिवाजी सातपुते–गोफनगुंडा
भगवंत सुरवसे–तिकास्र
श्रीकृष्ण उबाळे–माणदेशी तडका
हनुमंत येवले–वात्रटिका
आबासाहेब निरमळे–वात्रटिका
भास्कर चव्हाण–वात्रटिका
धर्मराज करपे–वात्रटिका
सुभाष राठोड–वात्रटिका
सुहास जोशी–वात्रटिका
अरुण रसाळ–सटकेबाजी
सुरेखा खेडकर–वात्रटिका
इ.सक्रिय वात्रटिकाकार वरील सदराखाली वात्रटिका लेखन करतात.

   सूर्यकांत डोळसे हे वेळोवेळी सूचना मार्गदर्शन करतात. या समुहाचया माध्यमातून अनेक नवीन वात्रटिकाकार वाचुन सरावाने नावारुपाला येत आहेत.
नव्या वात्रटिकाकारांसाठी रोज ताजा विविधतापूर्ण खजिना वाचायला मिळत आहे. त्यात दुधात साखर म्हणून सा.सुर्यकांती अनेकांच्या लेखनीला स्थान देत आहे. सध्या
सा.सुर्यकांतीने वात्रटिका लेखन स्पर्धा ठेवलेल्या आहेत.
भाग १.स्थानिक राजकारण
भाग २.नववर्षाचे स्वागत
त्यातून अनेक लिहिते होणार आहेत.

     असा हा आगळा आणि वेगळा समूह आहे. जो एक वात्रटिका या साहित्य प्रकाराची
एक साहित्य चळवळ म्हणून सिद्ध होत आहे आणि भावी महाराष्ट्राला दमाचे वात्रटिकाकार
पुरवण्याचे काम करणार आहे यात काही शंका नाही.

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,च-हाटा बीड
      मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'