संत तुकाराम व वात्रटिका
*संत तुकाराम यांचे टिकात्मक अभंग व वात्रटिका*
संत तुकाराम यांच्या गाथेमध्ये जवळजवळ 4092 अभंग आहेत
.भक्तीभाव,गीता,ईश्वर या अभंगासोबत त्यांचे टिकात्मक शेकडो अभंग आहेत. त्यादृष्टीने विचार केल्यास संत तुकाराम हे एक वात्रटिकाकार होते असे विधान केल्यास त्यात वावगे काही आहे असे वाटणार नाही.
"दंभीक बाबीला आपल्या शब्दाच्या आसुडाने झोडने मग ते झोडतना कोणाच्या कोमल भावना दुखल्या तरी पर्वा नाही" हे सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिकेच्या भुमिकेतुन वेळोवेळी स्पष्ट होते.
तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी दंभीक,खोटारडया,चुक, विरोधाभास असणाऱ्या बाबिंवर प्रहार केले. तुकारामांना त्याचा त्रास झाला तरीही ते डगमगले नाहीत. त्यांच्या अभंगाचे काही उदा. पाहु.....!
१.नाही निर्मळ जीवन
काय करील साबण ?
२.तिर्थी धोंडा पाणी
देव रोकडा सज्जनी ।।
३.अवगुणांचे हाती
आहे अवघीच फजीती ।।
४.अर्थेविन पाठांतर कायसा
करावे
व्यर्थची मरावे घोकुनिया ?।।
५.मुखी बोले ब्रम्हज्ञान
मनी धनाभिमान
पोटासाठी संत
झाले कलींत बाहुत ।।
६.भुके नाही अन्न ।
मेल्यावरी पिंडदान ।।
७. नको सांडु अन्न नको सेवु वन
चित्ती नारायण सर्व भोगी ।
सूखे खावे अन्न
त्याचे करावे चिंतन ।।
हे त्यांचे काही उदाहरणे आहेत त्यांचे असे शेकडो अभंग आहेत जे तत्कालीन परीस्थितीवर लिहिले आहेत पण आजही ते 100% लागू होतात. वात्रटिका लेखण करणाऱ्याला एक आदर्श म्हणून संत तुकाराम यांचे टिकात्मक अभंग आहेत. त्याचे वाचन केले तर एक मार्ग नक्की सापडु शकतो. अभंग वाचल्यावर
आपल्या हे ही लक्षात येईल की
संत तुकाराम यांचे टिकात्मक अभंग व वात्रटिका यांचा जवळचा संबंध आहे....! मा. डोळसे सरांनी पाच अभंग व त्यामागची भूमिका काय असु शकते ते लिहिण्यास परवानगी दिली आहे ते पुढील अंकात पाहु.
✍🏻श्रीकृष्ण उबाळे, च-हाटा बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment