पदे मिळाली आता

वात्रटिका

पदे मिळाली आता
––––––––––
सारी सत्तेची तिजोरी
सारा सत्तेचाच ठेवा
पदे मिळाली आता
तुम्ही मनसोक्त जेवा

पिते सत्ता डोळे मिटूनी
जात ही बहाद्दरांची
उगाच मनी असे का रे
सदा भिती मतदारांची

भल्या पारदर्शकतेला
सारा मोह का सुटावा?
पदे मिळाली आता
सारे मनसोक्त जेवा

एकाजागी होतो शून्य
दलबदलुन पद मान्य
सत्ता मिळवने हेतु
नाही दूसरा अन्य

दलोदली पदासाठी
गोलमाल वापरावा
पदे मिळाली आता
सारे मनसोक्त जेवा

स्वार्थ जनु मनातला
आरसाच पक्का
जोतो देतो एकमेकाना
जोरदार असा धक्का

गुळासाठी मुंगळ्याना
मोह का न सूटावा
पदे मिळाली आता
सारे मनसोक्त जेवा

👉श्रीकृष्ण उबाळे,बीड
      9405344642
Visit:-aajchotika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'