होळी व राजकीय पोळी
होळी व राजकीय पोळी
------------------------------
भगवे,हिरवे,निळे,पिवळे
सारे एकमेकांत मिसळलेले
रंग जसे होळीचे असतात
फायदा तोटा पाहून घुसळलेले
रंग राजकीय टोळीचे असतात
वरून विरोधाच्या बोंबा
दाखवण्यापूरते तोंड काळे
आतून सत्ता मालमत्तेची नशा
एकमेकांचे एकीचे घट्ट जाळे
फायद्याच्या धुलिवंदनासाठी
कुणाचीही होळी असते
कारण प्रत्येकाला भाजायची
राजकीय पोळी असते
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,चऱ्हाटा,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment