आमची कळ
आमची कळ
-----------------
जिकडे तिकडे एकच नाद
जिकडे तिकडे एकच खल
काय तं म्हणे इंडिया झाला
सारा सारा डिजिटल
टीव्हीवरच्या जाहिरातींनी
सिटी झाल्या स्मार्ट
देशाचे भविष्य असे
शहरा शहरातला पार्ट
आम्ही कुणाचं वाईट केलं
त्याचं असलं फळ आहे
आमचं सारंच फाटकय हो
पोटात भुकेची कळ आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,चऱ्हाटा,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment