करडू बालकविता

करडू
-------
एक लहान करडू
मोठ्याने लागलं ओरडू
भूक लागली खुप
राहत नव्हते चूप

शेळी गेली रानात
पिल्लू तिच्या मनात
संध्याकाळ झाली
शेळी पळत आली

वाट पाही तान्हा
फुटला तिला पान्हा
दूध लागलं गळू
पिऊ लागले हळू

तोंडाला आले फुगे
शेळी टकमक बघे
टम्म होऊन आवरले
सांडासारखे बावरले

मग लागलं खेळायला
वाऱ्यासारखं पळायला
दिसायला बांडं काळ
शेळीचं लाडकं बाळ

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मु.पो.चऱ्हाटा ता.बीड
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'