लोकशाहीचा चेहरा
वात्रटिका लेखन स्पर्धा-७ साठी
लोकशाहीचा चेहरा
------------------------
तेच सारे इकडून तिकडून
आलटून पालटून सत्तेवर
डोळा त्यांचा असतो फक्त
फुकटाच्या मालमत्तेवर
प्रश्नच अजून बदलले नाहीत
हे जरा अती आहे
आपल्या लोकशाहीची
हिच खरी प्रगती आहे
लोकशाहीच्या सत्तरीमध्ये
पदावाल्यांचा विकास दिसतो
वाढत्या वयातील लोकशाहीचा
चेहरा मात्र भकास दिसतो
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,चऱ्हाटा बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment