माय मराठी
मराठी
---------
मराठी आमची माय
मराठी आमची बोली
मराठी महाराष्ट्रातल्या
हृदयामधील खोली
ज्यांनी तिला तारावे
तेच धूळ चारीत आहेत
खेड्यामधली तिची लेकरे
तिची सेवा करीत आहेत
इंग्लिश नावाच्या स्कूलमधून
मराठी हद्दपार होत आहे
मुंबई पाठोपाठ शहरांमधून
मराठी ठार होत आहे...!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,चऱ्हाटा बीड
Comments
Post a Comment