सोपा मार्ग
वात्रटिका
सोपा मार्ग
मंदिर हवे की मशीद
राष्ट्रीय प्रश्न होत आहे
भावना व्यावसायिकांना
किती जश्न होत आहे
राम असोत किंवा रहीम
स्वतः कधी भांडले नाहीत
स्वतःच्या वास्तुसाठी त्यांनी
रक्त कधी सांडले नाहीत
मंदिर मशीद चर्चेमुळे
निवडणूक तेवढी सोपी जाते
आडाण्यांसह शिकलेली
बुद्धी एवढी झोपी जाते
©श्रीकृष्ण उबाळे
मु.पो.च-हाटा ता.बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment