माणुसकीची होळी

वात्रटिका

माणुसकीची होळी

रंग एकाचे अंग एकाचे
डोके मात्र भलते आहे
लाकडं दुसरी माकडं तिसरी
माणुसकी का सलते आहे ?

मनामनात पेटवून जाळ
त्यांच्यासाठी होळी असते
मानवतेच्या जाळावरती
भाजलेली पोळी असते

बोंबा मारा आरडाओरडा
तेवढ्यासाठी तुम्ही शूर
भक्त भांडले रक्त सांडले
रस्त्यावरती आला पूर

©श्रीकृष्ण उबाळे
मु.पो.च-हाटा ता.बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी