पुतळ्याआडचा धंदा
वात्रटिका
पुतळ्याआडचा धंदा
------------------------
राजकीय कंड जिरवण्यास
सारेजण उथळे असतात
त्याचाच तर परिपाक
तुटलेले पुतळे असतात
उथळ पाण्याचा खळखळाट
फार काळ टिकाऊ नसतो
पुतळ्याआडचा धंदा
भावना पिकवू असतो
श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.9405344642
दै. माणदेश नगरी, सोलापूर
Comments
Post a Comment