वात्रटिका समाजाचा अरसा
*वात्रटिका समाजाचा आरसा*
वात्रटिका म्हणजे काय असा प्रश्न कोणी विचारला तर मी पटकन उत्तर देईल "समाजाचा आरसा म्हणजे वात्रटिका." समाजात अनेक घटना घडत असतात, त्याचे काव्यवर्णन केले की ती वात्रटिका होऊ शकत नाही. "काही महत्वपूर्ण घटना ,प्रसंग त्यातील विसंगती,
प्रवृत्ती ,अपप्रवृत्ती , त्यातून निर्माण होणारे विनोद, कधी गंभीरता , चुकीच्या बाबिंवर केलेला जोरदार हल्ला तोही अगदी संक्षिप्त रुपात आणि तालात त्याला वात्रटिका म्हणता येईल."
संत तुकारामाचे बरेच अभंग यात येऊ शकतात उदा.
"ऐसे कैसे झाले भोंदु
कर्म करुनी म्हणती साधु ||
अंगा लाऊनीया राख
डोळे झाकुन करती पाप ||
दाऊनी वैराग्याच्या कळा
भोगी विषयाचा सोहळा ||
तुका म्हणे सांगो किती
जळो तयाची संगती ||
हे फक्त एक उदा. आहे असे तुकारामांचे अनेक अभंग आहेत.
महात्मा फुल्यांचा अखंडही यात येऊ शकतो. अनेक अखंड रचना चुकीच्या बाबींवर प्रहार करतात त्याही अगदी निर्भिडपणे
. संत कबीर यांच्या अभंग रचना तसेच त्यांचे अनेक दोहे वात्रटिकेशी मिळतेजुळते आहेत.
उदा.
"दारू गांजा मत पी यारा
अकल गुंग हो जाती है
आपने पल्लो का दाम खर्चकर
मु मे मखिया जाती है"
"समाजातील घडणा-या दांभीक बाबीला शब्दाच्या आसुडाने फोडने झोडने त्याला वात्रटिका म्हणता येईल." किंवा
समाजजीवनात दांभिकतेची सुज हा मोठेपणा नसुन तो 'पु' झालेला 'बेंड' आहे आणि तो आपल्या शब्द सामर्थ्यने फोडने त्यालाही वात्रटिका म्हणू शकु."
वात्रटिका काल्पनिक विषयावर नसतात तर जीवंत व्यक्ती , अभिव्यक्ती , प्रवृती , संस्कृती , समाज यावर असतात.
म्हणी ,वर्तमानपत्रातिल व्यंग्यचित्र हे सुद्धा वात्रटिका प्रकाराशी जुळताना दिसतात...!
थोडक्यात वात्रटिकाकाराला पत्रकार , कवी , समीक्षक , व्यंग्यकार आशा अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. आणि समाज त्यातील घटना यापासुन तो लांब पळू शकत नाही. समाजात जे घडतं त्याचे रूप वात्रटिकेत पाहायला मिळते म्हणून आपण वात्रटिकेला समाजाचा आरसा म्हणू शकतो.
✍ श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment