तरुणाई
*तरुणाई*
कार्यकर्ते तरुण
नेते त्यांना धरून
तुकड्यासाठी लाचार
माना डुलवण्यापुरते विचार
लोकशाही ओक्साबोक्सी रडतेय
सांगा तरुणाई घडतेय की बिघडतेय....!
जाती धर्माची दंगल
त्यात मोजक्यांचे मंगल
माणुसकीची लागली वाट
मनामनात द्वेशाचे घाट
देशाचे भविष्य याने सडतेय
सांगा तरुणाई घडतेय की बिघडतेय....!
दारुचे मारतोय फुरके
सिगार गांजाचे झुरके
वयाआधिच खंगलेला
जमण्याआधीच पांगलेला
भयानातील भयान सवय जडतेय
सांगा तरुणाई घडतेय की बिघडतेय....!
जगोजागी आत्याचार
ठिकठिकाणी बलात्कार
न्याय झाला पार अनाथ
अन्यायाला देतोय साथ
चांगल्यासाठी कुठे घोडे आडतेय ?
सांगा तरुणाई घडतेय की बिघडतेय....!
त्याचा माथी सोटा दिला
शिकवुन ज्याने मोठा केला
इंग्लड अमेरीकेची खाज
देशाची त्याला वाटते लाज
वृद्धाश्रमाचे पिक वाढतेय
सांगा तरुणाई घडतेय की बिघडतेय....!
दहशतीचा नाद खुळा
नक्षलिचा कोण खुळखुळा?
उदोउदोच्या मागे पळतेय
दुधासोबत ताकही पोळतेय
देशाचे अंकुर कोण खुडतेय ?
सांगा तरुणाई घडतेय की बिघडतेय....!
काही बनलेत भविष्यरेषा
बोलू लागलेत मंगल भाषा
त्यांची फक्त नवीन कमना
क्षणोक्षणी दुष्टांचा सामना
त्यांचे मनोबल ओसाडतेय
सांगा तरुणाई घडतेय की बिघडतेय....!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment