आवाज व खाणे

*बालकविता*

आवाज व खाणे
–––––––––
कावळा म्हणतो काव काव
खायला मागतो ताजा पाव
चिमणी करते चिव चिव
इवले खातें छोटा जीव

मांजर करते म्याऊ म्याऊ
दूध उंदीर तिचा खाऊ
पोपट करतो मिठू मिठू
पेरू खातो गुटूगुटू

कोंबडी करते पकपक पक
दाणे खाते बकबक बक
कुत्तू करतो भौऊ भौऊ
भाकर हड्डी त्याचा खाऊ

कबूतर करते गुटर गूं
खाता खाता उडते हूं
शेळी करते बे बे बे
म्हणते हिरवा पाला दे

✍🏻 श्रीकृष्ण उबाळे
मु. पो. च-हाटा ता. बीड
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी