मी एक कवी बोलतोय
मी एक कवी बोलतोय
––––––––––––
मनात आलेली भावना
मुक्तपण मीे मांडतोय
माणुसकीसाठी रक्ताची
शाई मी सांडतोय
जेवढ खोलता येईल
तेवढ नक्की खोलतोय
मी एक कवी बोलतोय
जे जे उदात्त आहेत
शब्दात त्याला कोंडतोय
जे जे फाटके आहेत
त्यांच्यासाठी भाडंतोय
जेवढ तोलता येईल
तेव्हढ नक्की तोलतोय
मी एक कवी बोलतोय
शब्द सारे सा-यांचे
कविता मात्र माझी होते
नवीन देऊन फोडनी
नवीन जसी भाजी होते
मिरे लवंगेसारखा जाळ
असा मसाला सोलतोय
मी एक कवी बोलतोय
शब्द माझा आसुड असतो
त्याने मी झोडतोय
मोठेेपणा नाही पु झालेला बेंड
तो मी हळूच फोडतोय
मग कुणाची दुखली
थोडाच त्याला सोडतोय
मी एक कवी बोलतोय
माझे मन बालक आहे
मीच माझा मालक आहे
डोलता येईल तेवढाच
मी एक आंदोलक आहे
बालकांसाठी बालक होऊन
त्यांच्यासोबत डोलतोय
मी एक कवी बोलतोय
मी कल्पना करीत नाही
मी वल्गना करीत नाही
जे शक्य नाही असा
मी आग्रही धरीत नाही
कुणी म्हणाले तर म्हणुद्या
मी नाकाने कांदा सोलतोय
मी एक कवी बोलतोय
मी प्रेरणेच्या गोष्टी गातोय
मी प्रेरणेच्या झऱ्याखाली न्हातोय
मी एक साधा माणूस आहे
जो निर्मळपणे वाहातोय
जेंव्हा सारे असतात झोपलेले
तेंव्हा माझे नेत्र खोलतोय
मी एक कवी बोलतोय......!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Supeeeeeeeeeerbbbbb daji no challenge
ReplyDelete