रंग सारे मस्त

*बालकविता*

रंग सारे मस्त
–––––––
काव काव कावळा
रंग तुझा सावळा
आईचं मनच खुळं
अंगभर लावल काळं

बघा बघा बगळा
गोरा गोमटा सगळा
किती तुझा नट्टापट्टा
पावडर लावली बट्टाबट्टा

मॅऊ मॅऊ मोर
रंग तुझा थोर
आकाशाचे चोरले रंग
सारे तुझ्यात दंग

पेरू खाऊ पोपट
रंग तुझा हिरवट
बोलून तु दंगवतो
चोंच कोण रंगवतो ?

रंग सारे मस्त
कोणी खराब नसतं
सारे तुम्ही छान
साऱ्या जगाची शान

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'