वात्रटिका
*सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका*
आज महाराष्ट्र राज्यात वात्रटिका असे नाव उच्चारले तरी सूर्यकांत डोळसे यांचे नाव घेतल्या शिवाय ते पूर्ण होवु शकणार नाही. ही काही खुशामत नाही एक वास्तव आहे. वात्रटिका या काव्य प्रकाराला आजतरी ते न्याय देण्याचे ईमाने इतबारे काम करीत आहेत.
मंगेश पाडगावकर, रामदास फुटाणे यांनी त्यांच्या परीने वात्रटिका प्रकाराला न्याय देण्याचा प्रयत्न केला यात वाद नाही. पण सूर्यकांत डोळसे यांनी आज वात्रटिका प्रकाराला वेगळा आयाम मिळवून देण्याचे काम केले आहे. कोणाला कमी जास्त लेखनण्याचा आजिबात विषय यात नाही.त्यांच्या वात्रटिकेची मला भावलेली काही वैशिष्ट्य आहेत...!
१.सोपे शब्द:- सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका मांडनिचा सर्वात महत्वाची मला वाटणारी बाब म्हणजे सोपी शब्द रचना. वाचता येणाऱ्या प्रत्येकाला समजेल अशी असते त्यामुळे वाचणाराला ती सहज समजते.
२.नवीन शब्द निर्मिती:- वात्रटिका रचना यामध्ये अनेक नव्या शब्दांना त्यानी जन्माला घातले. मराठी भाषेसाठी नव्या शब्दांची भर त्यानी घातली. त्यांच्या वात्रटिका वाचतना अनेक नवे न वाचलेले शब्द वाचायला मिळतात.
३.यमक रचना:-
सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिकेत यमक जोडी दुसऱ्या व चौथ्या ओळीत पाहायला मिळते. यमक जुळवायचे म्हणून जूळवलेले नसतात. त्यात अर्थ असतो ,कधी मनोरंजन करतात,कधी गंभीर करतात.
वास्तवतेचे दर्शन :-
काहीतरी अजब गजब नसते. प्रत्येक वात्रटिका वास्तवतेशी नाळ जोडलेली असते. वास्तवता असल्यामुळे लोकांना लगेच आवडते. एखादी घटना घडते त्यावर समाज मनात काय चाललय याचा अचूक वेध घेतलेला असतो. लोक मनातील भावना असल्याने लोक लगेच स्विकारतात.
प्रहार :- अनेक विषयावर त्यांनी निडरपणे प्रहार केलेला जाणवतो. न भीता बिनधास्त त्यांनी शब्दकोरडे ओढलेले आहेत.
झुंजार'पुण्य' :-
त्यांना लाखोंचा वाचक उपलब्ध झाला तो दै.झुंजार नेता,दै.पुण्य नगरी या लोकप्रिय दैनिकातुन. झुंजार नेता मध्ये 'फेरफटका' व पुण्य नगरीमध्ये 'चिमटा' या पहिल्या पानावरील सदराने त्यांना हक्काचा वाचक उपलब्ध झाला. त्यातून अनेकजन वाचता वाचता लिहिते झाले त्यात मी एक आहे.
सोशल मीडिया :-
Whatsapp, Google plus, blogger, Facebook, Twitter तसेच E-books यांच्या मार्फत आगदी सहज ते वाचकांपर्यत पोचतात.
बाल वात्रटिका :-
खास बालकांसाठी त्यांच्या काही बाल वात्रटिका प्रसिद्ध आहेत. आगदी सोप्या बालकांना आवडतील अश्या रचना आहेत.
बालकांसाठी खास नजरानाच आहेत.
आकार :-
त्यांच्या बहुतेक वात्रटिका हया चार ओळी असणाऱ्या दोन कडव्याच्या असतात. कधी तीन कडव्याच्या असतात पण क्वचितच. निवडक काही मात्र मोठ्या असतात. जसे 'मासाहेब आम्हाला माफ़ करा', 'नाथाळाच्या माथी काठी हाना'.
प्रेरणाच प्रेरणा :-
नव वात्रटिकाकारांना त्यांची वात्रटिका ते स्वतः तसेच त्यांचे सा.ई-सुर्यकांती प्रेरणा देते. पोकळ स्तुती न करता चुकिला चुक म्हणून ते वेळोवेळी बजावतात.
अशी ही मा.सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका आहे जीने आज स्वतःच्या व वाचकांच्या जोरावर आपला वेगळा ठसा उमठवला आहे.
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,च-हाटा बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment