नव्याचा दृष्टीकोण

वात्रटिका

नव्याचा दृष्टीकोण
––––––––––
नव्या वर्षाच्या स्वागताला
सारे कसे 'तर्रतरुण' आहेत
व्हॉट्सप अन फेसबूकवर
सारे कसे भरभरुन आहेत

इकडे नारे तिकडे नारे
जिकडे तिकडे संदेशवारे
पुन्हा थंड पडतात सारे
चार दिवस मारुन फवारे

ओळख'णाऱ्याला' समजावे
प्रत्येक क्षणक्षण नवा आहे
नव्याला जाणुन जगणारा
फक्त दृष्टीकोण हवा आहे

✍ श्रीकृष्ण उबाळे,च-हाटा (बीड)
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'