स्थानिक स्वराज्य
*वात्रटिका*
स्थनिक स्वराज्य
–––––––––
संस्था असतात स्थानिक
राजा महाराजांचे माणिक
ज्याचे त्याचे येते स्वराज्य
पाजून पैसे दारुचे टॉनिक
एक असतो मतदारराजा
त्याची चार दिवस मजा
नंतर कोणी डूंकत नाही
भोगतो मग कर्माची सजा
लोकशाही असते काय ?
चोर मवाली होतो हायफाय
विकासाचे म्हणाल तर..
खाली मुंडके वर पाय....!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,
च-हाटा(बीड)
मो.9405344642
Comments
Post a Comment