सेनापती
सेनापती
–––––
एक असतो सेनापती
जात असतो दिल्ली
प्रमुख त्याला टाळतो
उडते त्याची खिल्ली
कधी तो गुरगुरतो
कोणी जोडीदार टुरटुरतो
इथून तिथून मानहानी
वेळोवेळी कुरकुरतो...!
त्यालाही असते खुर्ची
तरीही भरतो मिर्ची
मग बसतो शिंकत
ताकद यात होते खर्ची
ते असतात मित्र
मिळून खातत एकत्र
कधी करतो विरोधी
असा हा विचित्र
एक युवा सेनापती
शोधतो नव्या उचापती
योजना देऊन फसतो
बसतो होऊन कुरापती
त्याने सोडलं की चावतय
त्याने धरलं की कावतय
सूधरेणा हो काहीच
सारं मित्राचच फावतय
त्यांचे म्हणे 'फ्यूजन'
त्याला तरी 'कन्फ्यूजन'
आता करील विरोध
लगेच भक्तिने पूजन
आपण कोण ठरवावे
नंतर कसेही मिरवावे
कोणी तरी होऊन पक्के
कोणाचे तरी जिरवावे..!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment