गाईची टिल्ली
*बालकविता*
गायीची टिल्ली
--------------------
आमची गाय व्याली
एक टिल्ली झाली
टिल्लीचं अंग मऊमऊ
मागु लागली खाऊ
हात लागली चाटायला
गुदूगुदु लागलं वाटायला
दिसते कशी बुटुकली
जीभ तिची चिटुकली
गोलगोल तिचे डोळे
वाटती लोण्याचे गोळे
चार तिचे छोटे पाय
हम्मा हम्मा करते गाय
चालते भारी लुटूक लुटूक
दुध पिते चुटुक चुटुक
तिच्या काढता खोड्या
टुणटूण मारते उड्या...!
✍🏻 श्रीकृष्ण उबाळे
मु.पो.च-हाटा ता.जि.बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment