शुद्धता

*शुद्धता*
–––––
पाण्याचा उगम होतो
ते पाणी असतं निर्मळ
जसं जसं वाहत येतं
तशी त्यात होते भेसळ

बाळाचा जन्म होतो
शुद्धतेचा गुण पक्का
जसा जसा वाढत जातो
बनतो जातीधर्माचा शिक्का

धर्मही तसाच उगवला
शुद्ध आणि सदाचरणी
नंतर त्यात भेसळ झाली
अनेकांची त्यात भरणी

पाणी करुन घेतो शुद्ध
धर्मासाठी करतो युद्ध
पाण्यासारखे जेंव्हा शिकु
तेंव्हाच माणुस म्हणून टिकु

शुद्धता नसेल होतात आजार
त्यानेच जग झालेय बेजार
शुद्धता बनुन जगलो
शुद्धता बनुन वागलो
मळाला नसेल जागा
मग निवांत मस्त जगा

✍श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642
  aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'