बालपण

बालपण
-----------
सकाळी उठुन पळायचं
मग मनसोक्त खेळायचं

नदी तळयावर पोहायचं
आधाशासारखं जेवायचं

आभ्यासापेक्षा खेळ गोट्या
जिंकून आण  एवढयामोठ्या

बाता मारायच्या भराभरा
अभ्यासाच्या नावाने हरभरा

गाणे गोष्टी मजाच वेगळी
चड्डी घालायची सदा ढगळी

जेवण्या आधीच डोळ्यात तार
भांडणामुळे खायचा मार

मस्त असतं कालपण
रम्य असतं बालपण

✍ श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी