घरच्यासाठी जग
*घरच्यासाठी जग*
मोबाईल स्क्रीनगार्ड लावणारा
वापरत नाही हेल्मेट
माणसाची आणि आकलेची
केंव्हा होईल भेट ?
पिऊ नको म्हणलं तरी
मारत बसतो पेग
झिंगाट सारा होऊन
बुंगाट करतो वेग
वाहतुकीचे सारे नियम
कोणीच नाही पाळत
बुद्धी कधी येईल
हेच नाही कळत
खड्डेमुक्त रस्ते पुल
हेही असावेत पक्के
म्हणजे कोणी खाणार नाही
मरणाचे फुकटचे धक्के
देशाच्या सीमेपेक्षा आज
रस्ता धोकादायक ठरतोय
सैनिकापेक्षा जास्त संख्येने
देशाचा तरूण आज मरतोय
जात असतो एकटा
मरत असतात जिवलग
स्वतःसाठी नाही बाबा
रक्षणाने घरचयांसाठी जग..!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मु पो च-हाटा ता जि बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment