ऊसतोड

*चित्रकाव्य*

ऊसतोडी
–––––
सारे जग रे थंडीत
आराम असतो नर्मीत
तव्हा तोडीतो रे ऊस
कामा घामाच्या गर्मीत ||1||

बाय माझी लेकुरवाळी
असे कामासाठी ताठ
पाचराड मऊमऊ गादी
माझ्या लेकराचा थाट ||2||

करतो मी रे कारखाना
ऊसतोडीचा हा धंदा
इचुकाटा मानीत नाही
हातपाय माझा बंदा  ||3||

बैल आनिक ऊसगाडी
बनली माझी रे जोडी
हाती घेवून कोयता
करतो पोटासाठी तोडी ||4||

होतं खुप जव्हा कष्ट
अन्न लागे तव्हा मिष्ट
हाती येतो जव्हा फोड
साखर लागे तव्हा गोड ||5||

✍ श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642
aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'