आता मी लढणारय......!!

*आता मी लढणारय*

कन्हत कुढत जगनं हे
आता मी सोडणारय
शेतकऱ्याचा पुत्र मी
आता मी लढणारय...||1||

मी हाई रे सर्वांचा
माझ्यासाठी नाही कोणी
मी दूध जरी काढीतो
दुसरेच खाती लोणी
माझ्यासाठी मीच
नवा मार्ग जोडणाराय...||2||

जो तो आपलं बघतो
करुण घेतो फायदा
शेतकऱ्याच्या मुळावर
आज बसला कायदा
आरे एक होऊन आता
मी कायदा मोडणारय...||2||

आपल्या देशात चहावाला
होतोय पंतप्रधान
आपल्या देशाला पोसणारा
त्याला येतय मारान
आता येईन जो आडवा
त्याला मी झोडणारय...||3||

कधी दुष्काळ धरीतो
कधी पाऊस मरीतो
त्यातून काहिबाही पिकलं
भाव धुळच चारीतो
सांगु का तुम्हाला मी
आता वेगळी वाट धरणारय...||4||

एक एक होऊन ठिणगी
मी लाऊन देईन आगी
दिसन त्यावर ठोका
सुस्ती करीन जागी
हातात क्रांतीची आग
आता माझ्या पेटणारय...||5||

माझ्या रक्ताला घामाला
योग्य मिळावा भाव
अधिग्रहण कायदे आता
मागे तुम्ही घ्याव
माझा गावरान इंगा
आता तुम्हाला दावणारय...||6||

✍ श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'