बाईचा जन्म

*चित्रकाव्य*

बाईचा जन्म
–––––––
बाईचा जन्म माझा
गृहीत मी पार ग
इथुन तिथून संसाराचा
वाहाते मी भार गं

जन्माआधी टोचन्या
बसती पोटामधी गं
मुलगा की मुलगी
तपास होतो आधी गं

दुनियेत येते कसीबसी
जगोजागी आगी गं
अनेक अन्याय सोसुन
ठरते मी दुर्भागी गं

असतो माझ्या जिण्याचा
एकच एक राम गं
माझ्यावर असतं सारं
लादलेलं काम गं

संसाराच्या भविष्याचा
पोटात माझ्या सार गं
माझे दुःख झेलते मी
मानत नाही हार गं

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642
Visit- aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'