बालकविता

थंडी
–––
थंडी थंडी आली
मज्जाच मज्जा झाली
अंगात शिरली हुडहुडी
दातांची आपली कुडकुडी

स्वेटर मफलर अंगात
चिल्ले पिल्ले रगात
थंडी असते खूब
मिळते आईची ऊब

तापायचं नरम नरम
अंघोळ कशी गरम गरम
खायचं कसं मस्त
करायचं सारं फस्त

पाणी प्यायचं घोटभर
झोप घ्यायची पोटभर
जरी सारं असलं गार
तरी थंडी आवडते फार

✍ श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'