देव गेला कुणीकडे
देव गेला कुणीकडे
------------------------
मी ऐकलय लहानपणी
देव असतो कणीकणी
देव असतो मनीमनी
देव भेटतो चराचरात
देव बसतो घराघरात
मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले
अनेक निष्पाप मारले गेले
अमेरीकेवर झाला हमला
दिसत होता मुडद्यांचा मामला
तालिबाण्यांनी बुद्धांना फोडले
अमेरिकेने इराक अन
अफगानिस्तानला तोफेनी झोडले
लाखो निष्पापांनी प्राण सोडले
जगभर इसिसने माणसं मारली
सैतानांनी माणुसकीला कधीच धूळ चारली
पाकिस्तानात रोज मरतात हिंदू
मदतीचा का दिसत नाही बिंदू
त्सुनामी येतो
महापुर येतो
वादळ येतात
दंगलीही होतात
यामध्ये किती
जीवाचे हाल होतात
जगामध्ये रोज
किती दुःख घडत असतील
जगामध्ये रोज
किती जीव रडत असतील
त्यावेळी कुठे असतो ?
कणाकणातला
मनामनातला
चराचरातला
अन
माणसाच्या घराघरातला देव...!
मी त्यालाच शोधतोय
सापडला तर सांगा त्याला
माझा हा निरोप
म्हणजे मग सगळयांना लागेल
बिनधास्त शांत अशी झोप...!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment