प्राण्यांचे दूखणे

*बालकविता*

प्राण्यांचे दुखणे
–––––––––

सांगा सांगा प्राण्यानो
तुमचं कधी दुखतं का ?
ठेच लागली दगड लागला
टेंगुळ कधी फुगतं का ?

तुमचा कधी होतो का
हात पाय फँक्चर ?
तुमच्यात असतो का
तपासायला डॉक्टर ?

थंडी ताप आल्यावर
पांघरुण काय घेता ?
सर्दी आणि खोकल्याला
औषध काय पेता ?

छोटाल्या दुखण्याची
नसते ना भीती
खरोखर ताकदवान
आहात तुम्ही किती ?

👉श्रीकृष्ण उबाळे
    मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'