प्रकाशाचा पिच्छा
*चित्रकाव्य*
प्रकाशाचा पिच्छा
–––––––––
नाही कोणी मी महान
दिवाच समजा लहान
छोट्या छोट्या ज्योतीने
होईल प्रकाशाचे वाहान
मला प्रकाशाची आस
मला प्रकाशाचा ध्यास
प्रकाश माझा प्राण आता
माझ्यासाठी झाला खास
थकलो मी अंधाराने
धरणार आहे प्रकाशवाट
एक एक पाऊल टाकून
लाविन अंधाराची वाट
थकलेले असतील बाहु
सुकलेले असेल अंग
तेंव्हा चालुन चालून
धरीन प्रकाशाचा संग
माझ्या पाठी कोणी नसले
असेल माझी सावली
आधार देईल मला
होऊन माझी सावली
ज्यांची असेल तयारी
त्यांची असेल इच्छा
आळस सोडून सारे
धरतील प्रकाशाचा पिच्छा
येईल राज्य प्रकाशाचे
होईल सारे लख्ख
प्रकाशच असतो जीवन
अंधारच म्हणील चक्क
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment