लोकशाहीची मज्जा

आजची वात्रटिका...!

लोकशाहिची मज्जा
–––––––––––
मोसमानुसार पक्षी जसे
देश बदलत असतात
नेतेही फायद्यासाठी पक्षीय
वेश बदलत असतात

लोकशाहीची खरी मज्जा
निवडणुकीच्या खळ्यात असते
निष्ठा बनली निव्वळ चेष्टा
सारे तळ्यात मळ्यात असते

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी