अंधाराचे राज्य
*चित्रकाव्य*
अंधाराचे राज्य
––––––––
अंधार मोठा असतो
अंधार खोटा असतो
अज्ञानाच्या काजळ्या
आता आपण पार करु
अंधाराचे राज्य चला रे
आता आपण चुर करु ||1||
सूर्य मावळला जातो
चंद्र झाकळला जातो
बत्त्यांनो प्रकाशाचे काम
आता आपण थोर करु
अंधाराचे राज्य चला रे
आता आपण चुर करु ||2||
दिव्या दिव्याचा प्रकाश
लख्ख धरणी आकाश
पाहिल तिकडे फक्त
प्रकाशाचा धुर करु
अंधाराचे राज्य चला रे
आता आपण चुर करु ||3||
पणत्या झिजल्या आहेत
ज्योती विझल्या आहेत
उजेडासाठी हरएक संकट
आता आपण दूर करु
अंधाराचे राज्य चला रे
आता आपण चुर करु ||4||
काजव्याला घाबरतो
त्याची ताकद किती असते ?
अंधाराच्या साम्राज्याला
प्रकाशाची भिती असते
अंधाराच्या अवघडजागी
आता आपण वार करु
अंधाराचे राज्य चला रे
आता आपण चुर करु ||5||
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment