तु आणि मी

*चित्रकाव्य*

तु आणि मी
---------------
तु तहान आहेस
मी पाणी होते
तु कान आहेस
मी गाणी होते

तु मानव आहेस
मी मानवियता होते
तु आत्मा आहेस
मी आत्मीयता होते

तु कृष्ण आहेस
मी यशोदा माय होते
तु वासरु आहेस
मी हंबरणारी गाय होते

तु धनुष्य आहेस
मी त्याचा बाण होते
तु रखुमाई आहेस
मी फातिमा खान होते

तु फक्त लेकरू आहेस
मी तुझी आई होते
तु माझा शिवबा आहेस
मी तुझी जिजाई होते

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी