मी वात्रटिकाकार कसा झालो ?

*मी वात्रटिकाकाकार कसा झालो*

      मी वर्ग आठवीला असताना पहिली कविता लिहिली. कविता 'पर्यावरण' अशी होती. माझे शिक्षक डी.जी.तांदळे यांना दाखवली. ते म्हणाले ,"ही मस्त वात्रटिका होईल." तेंव्हा वात्रटिका काय असते हे माहित नव्हते..! एवढेच समजले की टीका करणे असेल कदाचित...!
  
    त्यावेळी गावात झुंजार नेता पेपर यायचा.. नंतर मी 10 विला असताना केंडे सर झुंजार नेता मध्ये प्रश्नाचे एक सदर चालवायचे त्यात माझे प्रश्नाला एक वेळा 20 रु बक्षिस मिळाले होते. त्यामुळे मी पेपर वाचायला लागलो. त्यात पहिल्या पानावर सूर्यकांत डोळसे यांचा फेरफटका
वाचायचो..!

    पुढे बलभीम कॉलेजला बी.एस सी. करताना *टपरीच्या दारी,कोंबडी आधी का अंडा आदी* या कविता लिहिल्या त्या काव्यवाचन स्पर्धेत खुप गाजल्या..! काहीजण तेंव्हा म्हणाले आशा कावितांना वात्रटिका म्हणतात....! पुन्हा डी.एड. ला असताना *घडलय काय अन घडतय काय* ही कविता भांडारकर संसथेवर  केलेल्या हल्यावर चार कडव्याची कविता लिहिली मित्रांना वाचुन दाखवली...! माझा  एक मित्र म्हणाला आशा कवितांना *वात्रट कविता* म्हणतात...!
  
    2008 ला डी.एड. पूर्ण झाल्यावर नोकरीच्या शोधात  असताना एक दिवाळी अंक काढ़ण्याचे ठरवले....! त्यात
वात्रटिकाकार प्रा.सत्यप्रेम लगड यांच्याकडून वात्रटिका घेतल्या..!
त्यांनी खुप जवळजवळ 100 वात्रटिका दिल्या.. त्या सर्व वाचल्या..! अंकात 20 घेतल्या अंकाचे नाव 'महाराष्ट्रवादी' ठेवले होते..!  मी बीडचा असल्याने झुंजार नेतामध्ये सूर्यकांत डोळसे यांच्या फेरफटका नियमित वाचयचो..! नंतर 2009ला जालना येथे नोकरीला लागल्यावर दै.पुण्य नगरीमध्ये चिमटा हे सूर्यकांत डाळसे यांचे सदर वाचु लागलो...!
वात्रटिकाकाराच्या बिजाची पेरणी माझ्यात आशा रितीने झाली...! नंतर 2015 पर्यंत लिखाण सामाजिक, राजकीय  लेख जवळजवळ असे होते...!

    12 जानेवारी 2016 रोजी जि.प प्रा शाळा राजाटाकळी जि जालना येथे जिजाऊ जयंती घेतली होती त्यात सूर्यकांत डोळसे सर यांची *मासाहेब आम्हाला माफ करा* ही कविता मुलांना सादर केली. शाळेतील सरांनी रेकॉर्ड केली मग मी ती कविता सूर्यकांत सर यांना पाठवली...! त्यांनी आवाजाचे खुप कौतुक केले..!

    त्याचवेळी विजय मल्या विदेशात पसार झाले होते त्यावर
मी *किंगफिशर* ही पहिली वात्रटिका लिहिली....!

हजारो कोटिंना
बँक देशाची बुडाली
किंगफिशरची स्वारी
आरामाने देशाबाहेर उडाली

पन्नास हजार ,लाखासाठी
शेतकरी अमचा मरतो
खरच माझा बाप
इतका मोठा गुन्हा करतो?

बुडव रे बापा
सगळे कर्ज बुडव
मोठयांसारखा करुन
जगण्याचा इतिहास घडव

झाला तर होऊदे
तुझा किंगफिशर
मरण्याचे बापा
आता तु विसर...!

सूर्यकांत सर यांना पाठवली त्यांनी कौतुक केले..! त्यांनी रोज लिहींण्याचा सल्ला दिला, लिहायला बळ मिळाले...! सूर्यकांत सर यांची प्रतिक्रिया मी मज्या सर्व मित्रांना दाखवली..!

     मग मी रोज लिहून डोळसे सर तसेच whatsapp ग्रुप वर टाकायचो...! अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया यायच्या..! डोळसे सर यांनी त्यांच्या व्हाटस एप्प ग्रुपला add केले..! वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांचा ब्लॉग अधाशासारखा वाचला आजही वेळ मिळेल तेंव्हा वचतो.

     दि.1 जून 2016 पासून जालना येथील दै.मत्स्योदरी ने
माझे 'मन की बात' वात्रटिका सदर सुरु केले..! तसा लिखनाला बहार येत गेला..! ऑगस्ट 2016 पासून सोलापूर येथील प्रसिद्ध ,लोकप्रिय दै.माणदेश नगरीचे उपसंपादक मा.मंगेश देशमुख यांनी माझ्या वत्रटिकांचे 'मणदेशी तडका' हे सदर पहिल्या पानावर सुरु केले..! डोलसे सर यांची *भूमिका* तसेच *जपुन लिहा* या गोष्टि सदैव ध्यनात असतात.

    थोडक्यात सूर्यकांत डोळसे सर यांनी माझ्या सुप्त प्रतिभेला चालना दिली... वात पेटवली.. मी परिपक्व झालेलो नाही मला आजुन खुप शिकणे बाकी आहे..!
आशारितीने मी वात्रटिका लिहिता झालो....!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'