वाट
वात्रटिका
वाट
------
बळीराजा आशेने पाहतो
सतत पावसाची वाट
बळीराजा आशेने पाहतो
भावाच्या नवसाची वाट
बळीराज्याच्या धान्याच्या
भावाचीही लागते वाट
बळीराज्याच्या इथूनतिथून
जिवाचीही लागते वाट
बळीराजा आता ऐक
आता शोध नवी वहीवाट
लढून भिडून अन्यायाशी
लाव साऱ्या वामनांची वाट
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment