बॅनर

वात्रटिका

बॅनर
-------
जयंत्या,मायंत्या,शुभेच्छा
जणू महापुरुषांना भीक
गावागावात,शहराशहरात
जिकडेतिकडे बॅनर्सचे पीक

शुभेच्छुकांच्या गर्दीमध्ये
भलत्यांची उंची वाढवली जाते
महापुरुषांच्या विचारांची उंची
चौकाचौकात खुडवली जाते

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी