डॉक्टर

वात्रटिका

डॉक्टर
---------
सांगा बरं डॉक्टर
माणूसकीवर का धाड?
देवत्वाच्या पेशाची
आज व्हावी चिरफाड

पांढऱ्या तुमच्या कोटाखाली
काळा काळ स्टेथेस्कोप
अनेक बिचाऱ्या जीवांना
तुमच्यामुळे कायमची झोप

लोकांना भूल देतादेता
स्वतःचीच तुम्हाला भूल
कशामुळे करता राव
माणुसकीला एप्रिल फुल

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी