हिरवे स्वप्न

हिरवे स्वप्न
-------------
त्याला माहित असतं
निसर्ग किती छळणार?
त्याला ठाऊक असतं
भाव किती पिळणार?

तरीही तो वर्षानुवर्षे
काढीत आलाय पीक
मानवतेची वहिवाट
कसा टाकीन पडीक?

दरवर्षी मिळत जातो
त्याला फक्त चकवा
हार माहित असताना
लढणारा योद्धा दाखवा

प्रेरणेचा असला झरा
जगात कुणी दुसरा नाही
तरीही या बळीराजाला
कुणाचाही आसरा नाही

स्वतःचा पालापाचोळा
तरी हिरवे स्वप्न उगवतो
हजार वेळा मुरुनसुद्धा
जगाला मात्र जगवतो

©श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी