रक्ताचा पूर

वात्रटिका

रक्ताचा पूर
--------------
जातीधर्माच्या नावावर
रस्तोरस्ती जाळपोळ आहे
मानवतेसाठी शोधले पाहिजे
नेमका कुठे घोळ आहे

दुसऱ्याच्या झेंड्यासाठी
तरुणाईच्या हाती दांडे आहेत
गंद्या राजकारणासाठी
असे बॉयलर अंडे आहेत

गंद्या अंड्याचे आम्लेट चारून
मानवता जाळून निघतो धूर
आगलावे दूर निवांत असतात
दंगलींतुन रक्ताचा येतो पूर...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,च-हाटा,बीड
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी