माध्यावधीचे वेध
वात्रटिका
मध्यावधीचे वेध
--------------------
धनुष्य घडी पाहून
बाणाने करतो छेद
इकडे अनेकांना लागले
मध्यावधीचे वेध
मध्यावधीच्या संधीसाठीची
अनेक साधू टपलेले
पुड्या सोडून शांतपणे
बगळे जणू लपलेले
भाजपाचा मंत्र मुखातून
छोटा भाऊ मोठा भाऊ
आपण आता असं करू
भांडत भांडत नांदत राहू
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment