हे प्रभूरामा

हे प्रभुरामा
---------------
माणुसकीच्या डोकेदुखीवर
कुठला बाम उरला नाही
काय सांगू प्रभुरामा आरे
कशातच राम उरला नाही

जगण्याएवढ्या किंतीचाही
इथे घाम पावत नाही
सदा हरणाऱ्या बळीरामाला
कधी दाम पावत नाही

मरणे स्वस्त जगणे महाग
जगी असा भाग पाहिला नाही
माणूसकीवर काळ काळा
कुठेच डाग पाहिला नाही

नावाचा उदोउदो होतोय रे
पण कुठे त्याग दिसला नाही
भावनेवर धंदा करणारा
असा महाभाग दिसला नाही

रामराज्याची चर्चा होते
कुणी ध्यास पहिला नाही
पाच वर्षात वरपुन कमाई
कुणी वनवास पाहिला नाही

छिनालपणा करताना कुणाला
घरची सीता पूरत नाही
माय बापाच्या आज्ञेसाठी
कुणाचे मनही झुरत नाही

सत्तासंपत्तीसाठी रक्त सांडते
लक्ष्मण भरत भेटत नाही
कुणी पोरी बाया पळवतो
लंका परत पेटत नाही....!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642
Visit:- aajchitika.blogspot.in
वाचा माझ्या ताज्या वात्रटिका....!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी