आयपीएल म्हणजे

आयपीएल म्हणजे
-----------------------
आयपीएलमुळे अनेकांना
सुगीचे दिवस जाऊ लागले
चेअर गर्लच्या कपड्यामुळे
प्रेक्षकांच्या डोळ्यांना कसे
भोगीचे दिवस येऊ लागले

कुणाला पाण्यासारखा पैसा
कुणाच्या काळजाचे पाणी
म्हातारेही गुणगुणू लागले
तरुण तरतरीत गाणी

आयपीएल म्हणजे काय?
तीन लाकडं अकरा माकडं
प्रेक्षक असतात केवळ
जाहिरातीच्या बळीची बोकडं

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी